आठवताना बालपण...

Started by asha_nadkarni, February 28, 2016, 01:04:34 PM

Previous topic - Next topic

asha_nadkarni

आई-बाबा, मीत्रांमधे
सारे जग सामावले होते
घराच्या सुरक्षित कवचात
आनंदाचे क्षण फुलत होते

आता जगात वावरताना
मोठेपण जाचु लागते
आनंदाच्या क्षणांची
आतुरतेने वाट बघू लागते

मान पान हेवे दावे
नात्यातले बंधन जाणवू लागते
हरवलेल्या बालपणाची
पुन्हा आठवण येऊ लागते

आयुष्याच्या जोडीदारात
सगळे जग विरघळू लागते
आपल्याच मुलांच्या बाललिलात
आपले बालपण पुन्हा येते

आठवताना बालपण
मन जरा भावुक होते
छोट्या छोट्या  आनंदाने
आयुष्य पुन्हा भरून जाते

-आशा नाडकर्णी