लेट पण थेट….

Started by samudra, February 28, 2016, 04:08:17 PM

Previous topic - Next topic

samudra

आयुष्याच्या वळणावर सुचले मला शहाणपण ,
सगळे करून भागले वाटले बरे होते लहानपण ...
आई होती मायाळू बाप होता खूप कष्टाळू,
इवलेसे माझे जग मात्र मन होते स्वप्नाळू ...

मोठा होउन होईल डॉक्टर वा इंजीनिअर ,
पैसा कमावेल खूप नाव करेल जगभर ...
नियतीच्या मनात मात्र काही औरच असते ,
प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतेच असे  नसते...

स्वन माझे घेऊन उडालो उंच आकाशात,
गिधाडांची टोळी भेटली वर प्रकाशात...
पसरवले पंख सामावलो त्यांच्यात ,
वाट मात्र चुकलो काही कळायच्या आत ...

स्वप्ने  पूर्ण करून होणार होतो श्रीमंत ,
पण नियतीने करून चीतपट दाखले आसमंत ... 
चुकलेल्या वाटेवर होणार होत काय ,
छाटले गेले पंख मोडलेत पाय ... 

आलो मग भानावर मात्र झाला होता उशीर ,
वाट धरली घरची तोडून टाकल्या त्या जंजीर ...
आई होती अधीर मात्र बाप माझा धीट  ,
म्हणाला विसरून जा सगळे आता सुरुवात कर नीट ...

आई बापाची पुण्याई आहे माझ्या बरोबर ,
ताकत आहे मनगटात विश्वास आहे स्वःतावर ...
स्वप्न माझे पूर्ण करणार लावतो मी बेट ,
आपल हे असाच असत लेट पण थेट....   
                                 By Sagar...