डोळ्यांत बसलेली ती

Started by Mayur Dhobale, March 02, 2016, 04:32:50 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

* डोळ्यांत बसलेली ती*
    ( एकतर्फी १ )


त्या काळ्याशार रात्री
का,कसे कोण जाणे परंतु ;
ती थेट डोळ्यांत जाऊन 'बसली'....
आणि गंमत म्हणजे ,
अजुनही  'डोळ्यांत' तशीच आहे!!!

काल परवा असाच एक पंटर;
माझ्या खांद्यावर हात ठेवून ,
डोळ्यांकडे बघत मला म्हणाला -
" तुझ्या डोळ्यांत एक वेगळीच 'चमक' आहे गड्या!!!"
मी झटकन् त्याचा हात हटवून ,
तेच डोळे वटारुन म्हणालो -
" ती फक्त माझी आहे, समजलं!!!"

ते सोडा, आज सकाळचाच किस्सा-
आई म्हणाली- " लहानपणापासून तू फारच रडका आहेस;
पण एवढ्यात कधी रडला नाहीस..."
मी मनातल्या मनातच पुटपुटलो-
" फार फार रडावसं वाटतय गं आई,
पण भिती वाटते;
'डोळ्यांतून' अश्रूंसोबत 'तीही'  अलगद 'निसटण्याची' .........


               -  मयुर ढोबळेhttps://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/