माझा देश...

Started by गणेश म. तायडे, March 03, 2016, 11:55:50 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

का चित्र बदलत आहे माझ्या देशाचे?
का अखंडता भंगत आहे माझ्या देशाची?
का तुकडे करू पाहतात आपलेच लोक देशाचे?
का शत्रू मोठा होत आहे आपल्या देशाचा?
विचार करा मित्रांनो का ही स्थिती होत आहे?
विचार करा मित्रांनो कोण ह्यास जबाबदार?
तुम्ही आम्ही शिकलो सोबत याच भारतात
प्रार्थना पण गायली आपण एकाच सुरात
मग का बोल वेगळे झाले अन् भाषा वेगळी झाली?
अखंडतेत एकता जपली आहे आपण साऱ्यांनी
शत्रू घराबाहेरचा मारता कधी पण येईल?
पण घरातील आपल्या बंधुना कसे दुखवता येईल?
नारे देश विरोधी आपल्या देशात का उठतात?
आपण असुरक्षित आहोत असे का लोक समजतात?
बोलण्याच्या अधिकारात कसे सारे विसरतात?
लोकशाहीचा गळा असा कसा आवळतात?
घरातील भांडण आता उंबरठ्या बाहेर जात आहे
घराची मर्यादा आपलेच का ओलांडत आहे?
शत्रू सगळं पाहून गालातल्या गालात हसत असेल
घरातील लोकंच फोडतील घर समजून बसला असेल
सांगा मित्रांनो त्यांना कि देश हा आमचा आहे
राहू सगळे सोबत जोपर्यंत जिवात जिव आहे
केला कितीही अट्टहास आम्हाला फोडण्याचा तुम्ही
कणभर ही ना तुटेल बंध आपल्या मनाची
देशाची शान बान आपणच सारे आहोत
देशभक्ती शिकवायला आता बाहेरचे नकोत
देशाच्या संविधानावर विश्वास ठेवा
देश आपलाच आहे फक्त थोडा धिर ठेवा
बस्स झाला गोंधळ मित्रांनो पुरे झाले आता
सांगा साऱ्या जगाला कमी लेखू नका आम्हाला

- गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com