हा ध्यास तुझा

Started by swapnilt310, March 13, 2016, 05:43:58 PM

Previous topic - Next topic

swapnilt310

तू कोण तू कुठली, मला माहीत नाही
चाहूदिशाना शोधी तुजला, पण काही ओळख नाही
पहाटेच्या सूर्यकिरणांत, मला नेहमी तूच दिसतेस
मनी दाटल्या अंधाराला, धीरे धीरे दूर सारतेस
पक्षांच्या त्या किल्बिलाटात, मी नेहमीच तुला ऎकतो
प्रेमाचे ते अबोल शब्द, माझ्या मनी साठवू पाहतो
पावसाच्या पहिल्या सरींमधून, तुझा स्पर्श मला जाणवतो
एकट्या माझ्या रुक्ष मनाला, पुन्हा एकदा बहरून टाकतो
हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत, मला तुझेच अस्तित्व भासते
वाऱ्याचे ते गार स्पर्श, तुझाच सहवास देऊन जाते
तुझे काळेभोर केस जेव्हा, मोकळा श्वास घेत असती
माझ्या जीवनी ती चांदरात, पुन्हा पुन्हा घेऊन येती