Prem Kavita

Started by nakode.sachin8, March 14, 2016, 06:12:56 PM

Previous topic - Next topic

nakode.sachin8

तप्त उन्हाचे गोड चांदणे,
मोहरले असते मौनतुन,
एक दीवाने नवथर गाणे.

तू असतीस तर फुलले असते,
मनी गुलाब हे प्रितीचे,
अन् रंगांनी भरले असते,
क्षितिजावरले खिन्न रितेपण.

तू असतीस तर सुटले असते,
जन्मभरिचे अवघड कोडे,
लाख सुखांनी भरले असते,
नीरस, अवजड जीवन माझे.

तू असतीस तर झाले असते,
आहे त्याहुनी जग हे सुंदर,
चांदण्यात विरघळले असते,
गगन धरेतिल धूसर अंतर.