विरहात तुझ्या मी

Started by Vikas Vilas Deo, March 15, 2016, 08:44:28 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo


विराहत तुझ्या मी
अग्नीसारखा जळत होतो.
पाण्याविणा माशासारखा
तुझ्याविणा तडफडत होतो.

विराहत तुझ्या मी
पावसासारखा बरसात होतो.
तरी चातकसारखा एका थेंबासाठी
तुझी वाट बघत होतो.

विराहत तुझ्या मी
वनव्यासारखा भटकत होतो.
वसंत ऋतुतही तुझ्याशीवाय मी
वाळवंटातील सूर्यासारखा तळपत होतो.

विराहत तुझ्या मी
मुखवटा घालून हसत होतो.
डोळ्यामध्ये असून आसवे
हास्यमागे त्यांना लपवत होतो.

विराहत तुझ्या मी
फकिरासारखा भटकत होतो.
तुझी लावूनीय आस
भक्तासरखा भजत होतो.