कन्या मानव्याची

Started by गजेंद्र, March 21, 2016, 04:21:02 PM

Previous topic - Next topic

गजेंद्र

मी अधीर
मी बधीर
मी रूधिर
सबंध विश्वाचे

मी स्तन्य
मी चैतन्य
चिवचिवाट अनन्य
घरट्यातल्या चिमण्यांचा

मी नागीन
मी जोगीण
मी वाघीण
जगातल्या क्रांतीयुद्धाची

मी स्वच्छंद
मी अनिर्बंध
मी मुक्तगंध
अपत्य निसर्गाचे

मी मोहिनी
मी रोहिणी
वंश वाहिनी
प्रचंड जगपसार्‍याची

मी सौंदर्य
मी माधूर्य
मी चातूर्य
घराचे घरपण

मी जगत
मी अप्रगत
मी स्वगत
आतापर्यंतच्या आकांताचे

मी पूष्पवेली
मी मूरगळली
मी रडवेली
कन्या मानव्याची

मी पंख फैलवावे
मी बंध सैलवावे
मी दिप पेटवावे
वंशाचे बापाच्या

मी चिंब व्हावे
मी वार्‍यात न्हावे
मी घूंगट झूगारावे

कारण मी अनंत
कारण मी स्वतंत्र
क्रांतीचा महामंत्र

                    आत्मशोध (काव्यसंग्रह)