आयुष्याच्या वाटेला

Started by abhishek panchal, March 25, 2016, 07:51:47 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

आयुष्याच्या वाटेला प्रगतीचे वाहन हवे
यशाच्या त्या शिखरावर जमीनीचे भान हवे
काट्यातुन चालताना अलगद कुणीतरी उचलावे
जीवनाच्या कवितेचे शब्द दुसऱ्याच कुणीतरी सुचवावे
दु:खात पण हसण्याचे कारण निळावे
त्या हसण्याने सारे दु:खच जळावे
कधी न तुटणारे घट्ट नाते बनावे
नात्यांच्या ओलाव्यात चिंब भिजुन जावे
कुणासाठी तरी खुप खुप जगावे
देवाकडे रोज त्यालाच मागावे

                                    - अभिषेक पांचाळ