तू भेटण्याआधी...

Started by श्री. प्रकाश साळवी, March 25, 2016, 02:56:20 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

तू भेटण्याआधी...! (कविता तिसरी)

सारे कसे विचित्र होते
कधी साकार होते
कधी नकार होते
मनाच्या अवस्थेचे
सारेच विचित्र होते!
विचारांचे वादळ होते,
मनाच्या खोल गर्तेत
सागराचे तांडव होते
नजरेत आतुरता होती
भिरभिरणा-या नजरेत
चंचलता होती
एवढा अस्वस्थ
कधी झालोच नव्हतो
घामाच्या धारांनी
पावसासारखा भिजत होतो
मनाची हूरहूर वाढत होती
तुझ्या येण्याची चाहूल
लागत नव्हती!
ठार वेडा झालो होतो...
तू भेटण्याआधी...
येणा-या प्रत्येक आकृतित
तुच दिसत होतीस
जवळ येताच निराशाच होती
तू भेटण्याआधी
मन आतुर झाले होते
अन त्याक्षणी.....!
विश्वास बसत नव्हता
तू भेटण्याआधी
भर दिवसा, चांद चमकत होता

श्री. प्रकाश साळवी.