अंधार लोटताना...

Started by dattarajp, March 26, 2016, 09:33:24 PM

Previous topic - Next topic

dattarajp

अंधार लोटताना ...
ती मजला सांगत होती .
मी जाते आता घरी,
ती मजला म्हणत होती .

अंधार लोटताना ...
ती दूर जात होती .
माझ्या या मनास ,
ती सोडून जात होती .

अंधार लोटताना ...
ती थोडे भीत होती .
तूला माझ्या सोबती रे ,
कोणी पाहिल म्हणत होती .

अंधार लोटताना ...
ती अशी जात होती .
मी येणार नाही आता ,
ती मजला म्हणत होती .

अंधार लोटताना ...
ती फार रडत होती .
तुझी शेवटची ही भेट ,
आहे म्हणत होती .

अंधार लोटताना ...
ती दूर गेली होती .
काटे मनी देवून ,
ती ते फूल न्हेली होती .

               बबलू
        9623567737