खिडकी

Started by Dnyaneshwar Musale, March 27, 2016, 08:04:36 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

माझ्या घराच्या समोर
एक आहे खिडकी
त्या खिडकीत दिसतो एक चेहरा
तो  लाखमोलाचा सुंदरसा मोहरा.

सकाळच्या कोवळ्या उन्हात
ती घेते त्या खिडकीचा ताबा
जणु बघण्याची मला
देतच असते मुभा.

मी नजर चुकवुन तिच्याकडे बघतो
तिला बघण्याच्या आशेने रात्रीला हि जागतो
एक दिवस तिला ते कळलं
आणि खिडकी नावाचं फुलच कोमजल.

खिडकी झाली होती आता बंद
पण मला ती बघण्याचा लागला होता छंद
वाटतं कधी तरी उघडेल ती खिडकी
पण समोर दिसते फक्त भिंत पडकी.