भाग्यवान किती मी...!!!

Started by Ravi Padekar, March 28, 2016, 05:58:55 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

भाग्यवान किती मी या मातीत जन्मलो
घडविले इतिहास त्यांच्या पानांपानात दंगलो

लाभले किती प्राचीन वास्तु या मातीला
शूर-वीरांनी त्याकरता प्राण लावले पणाला

विश्व हे सारे, त्याच्या धावांच्या पावसात भिजलं
पराक्रमाने आपल्या "सचिन" हे नाव मातीत कोरलं

या मातीसाठी एक एक होऊन येतात क्षणाला
माणुसकी हे एकच नातं टिकवतात सणाला 

झुकली नाही नजर, कधी झुकली नाही मान
परस्त्रीचा आदर याचाच आम्हा अभिमान
स्वराज्य घडवूनी अजरामर आहे त्यांची शान
असा राजा होणे नाही याची सर्वांना असे जाण

भाग्यवान किती मी या मातीत जन्मलो
सीमेवर तटकर सैन्य अमूचे म्हणून आज आम्ही उरलो......        To be continued

कवि:- रवि पाडेकर (मुंबई)
मो.- 8454843034