आयुष्य..!

Started by Rajesh khakre, April 01, 2016, 11:10:47 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

आयुष्य..!

आयुष्य सोपं की अवघड
हेच खुप मोठ कोडं
दुःखाचे घोट लई कडू
सुख मात्र वाटे गोड

आयुष्यात चढउतार
आहेच नेहमी ठरलेले
जीवनाच्या शेतामध्ये
सुख-दुःख पेरेलेले

हृदयात दुःख दाटलं की
एखादेवेळी फूटतं
साठलेल्या आसवानां
मोकळी वाट करतं

उमटते कधी हसु
उमलनाऱ्या चेहऱ्यावर
जगण्याची प्रेरणा
तेच देते आयुष्यभर
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


Dharesh bhimrao kolhe