pudhari

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:08:44 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

डमरु वाजवी मदारी, तुझा हा पुढारी
जडली आशा तुला खुळ्या भ्रांतीची
चल उचल मशाल भीम क्रांतीची !!

भीमाच्या नावाने हा करतोय खेळं
भीम कार्याच ना त्याच्यात बळं
पैसे कमवायचं याचं साधन निळं
भीम कार्याचा झाला सारा बट्याबोळं
हाव त्याला खुर्ची अन् मंत्रीची !
चल उचल मशाल भीम क्रांतीची !!

धारदार विळा त्याचा कापतोय गळा
ओसाड केला सारा भीमाचा हा मळा
हातभार लावतोया मनुवादी बळा
आता तरी उठ, ओळख त्याच्या खेळा
गरज हवी आता नवतंत्रची
चल उचल मशाल भीम क्रांतीची !!

अन्याय विषमता जातिवाद गाडू
दुभंगलेली भीमक्रांती पुन्हा ही जोडू
जातीच्या त्या  गद्दाराचे मुरदे रे पाडू
संजया संगे भीमरथ हा ओढू
गरज आहे देशा, भीम नीतीची
चल उचल मशाल भीम क्रांतीची !!

भीमकवी संजय बनसोडे
9819444028