शालेय लव...

Started by Mayur Dhobale, April 02, 2016, 11:09:24 AM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

व्वा, ते पण काय प्रेम असायच...

नाजूक होतं ते वय..
तरी नव्हते कुणाचे भय...
हृदयाला कागदात गुंडाळून ;
कागदाच विमान करून ,
विमान तिच्या दिशेनं फेकायच...
उलगडताच हृदय तिनेही;
खोटं खोटं चिडायचं...
तिच ते चिडणंही बघा किती ,
माझ्या काळजाला भिडायचं....
व्वा, ते पण काय प्रेम असायच...

कधी नजरेला नजर भिडताच,
सहजतेचा भाव आणुन,
तिने फळ्याकडे बघायचं...
शाळा सुटताच तिची सावली बनुन;
तिच्या मागे मागे झुरायचं...
घराचे गेट बंद करताच,
तीने चोरून मला बघायचं...
व्वा, ते पण काय प्रेम असायच...

" मागे मागे नको फिरू हं,
नाहीतर सांगेल सरांना नाव..."
कधीमधी गोड धमकावत,
ति खायची देखील भाव...
पण जेव्हा फटके
'मला' बसायचे...
पाणी 'तीच्या' डोळ्यांत साचायचं....
व्वा, ते पण काय प्रेम असायच...


माहित नाही कशी...
तिची स्वाध्यायाची वही;
कपाटात अजुनही तशी...
अजुनही आहे त्यात,
तेव्हाच सापडलेलं पिंपळ पान...
थोडही ना पुसलं,
तिने त्यावर काढलेलं,
तिच्या 'दिलाच' चित्र ....
अजूनही तशीच दिसताहेत;
चिञात तिच्या हस्ताक्षरात;
कोरलेली आम्हा दोघांची नावं....
तरी एक प्रश्न सतावतोय,
का काढला असावा तिने ;
नावांच्या मधुन छेदत जाणारा  'बाण'.....
जो आजही ,
आतुन मला चिरत आहे....

तरीपण ते पान मि,
न चुकता रोज हातात घ्यायचं ....
पुन्हा पुन्हा तसच लटके हसायचं....
आणि म्हणायचं -

व्वा, ते पण काय प्रेम असायच...
व्वा, ते पण काय प्रेम असायच...



                       -    मयुर ढोबळे

https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/