babasaheb tyach nav

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:52:45 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

पतितांचा पालनहार
दिनदुबळ्यांचा आधार
केला अन्यायावर वार.........
बघा जाऊन गावोगाव
बाबासाहेब त्याचं नाव !!

त्या ढोंगी विषमतेला
गाडीले जातिवादाला
घाली जुल्मा विरुद्ध बंड
नव्हता एक क्षण ही थंड
मांडिला समतेचा डाव.........
बघा जाऊन गावोगाव
बाबासाहेब त्याचं नाव !!

धमण्यात उसळे रक्त
होते न्यायासाठी सक्त
ना झुकली कधी मान
अंगी बंड घाली थैमान
घातला चातुर्वर्णावर घाव .........
बघा जाऊन गावोगाव
बाबासाहेब त्याचं नाव !!

अस्पृश्य डाग धुतला
परिवर्तन करण्या उठला
बुद्धाला शरण आला
संजय नमन करी त्या वाघाला
साऱ्या जगी त्याचा प्रभाव ..........
बघा जाऊन गावोगाव
बाबासाहेब त्याचं नाव !!

भीमकवी संजय बनसोडे
9819444028