vadhadivas sajara karu

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 05:17:14 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

रोजची वर्दळ मागे सारू
बायको पोरांवर ही प्रेम करू
म्हटलं चला ............
आज वाढदिवस साजरा करू !!

रोजची गर्दी रोजची वर्दी
एक्स्ट्रा कामाची साहेबांची अर्जी
अलिप्त राहून थोडा आराम करू
म्हटलं चला .........
आज वाढदिवस साजरा करू !!

स्टीलचा ग्लास वांग्याचा त्रास
रोजच होई मटण फ्रायचा भास
काचेच्या ग्लासात थोडी विस्की भरू
म्हटलं चला ..........
आज वाढदिवस साजरा करू !!

लाडाची लेक मांगे  केक
बायकोच्या तर मागण्या अनेक
सर्व नाही, एक तरी पूर्ण करू
म्हटलं चला ..........
आज वाढदिवस साजरा करू !!

लुटारु बाजार महागाई आजार
हॉटेलचे बिल दोन हजार
आज तरी हसत मुखाने भरू
म्हटलं चला............
आज वाढदिवस साजरा करू !!

ऑटोचे भाडे भासे डोंगरा येवढे
मुलांना तर ऑटोच आवडे
आज तरी ऑटोत बसून फिरू
म्हटलं चला ..........
आज वाढदिवस साजरा करू !!

मोकळा बगीच्या तिथे ज्युसवाला लुच्च्या
साऱ्यांची होई पिण्याची ईच्छा
फुल्ल नाही तरी टू बाय फोर करू
म्हटलं चला..........
आज वाढदिवस साजरा करू !!

जावं शॉटकट समोर पिझ्झाहट
मुलांनी लावली खाण्याची रठ
पप्पा, खाऊन थोडं पुन्हा फिरू
म्हटलं चला ........
आज वाढदिवस साजरा करू !!

येता घरी मित्र फोन करी
खंबा घेऊन जाऊ चायनीजवरी
वाटलं मित्रांसोबतही मन मोकळे करू
म्हटलं चला ..........
आज वाढदिवस साजरा करू !!

कवी संजय बनसोडे
15/03/1986
9819444028