jatyavarach gana

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 05:23:26 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

शिवार फाटलं दुःख हे दाटलं
विहीर झाली कोरडी,
विहीर झाली कोरडी
बघून धरणी माय ओरडी !!

जमिनीत भेगा दिसतात रेघा
नरडी साऱ्यांची कोरडी,
नरडी साऱ्यांची कोरडी
बघून धरणी माय ओरडी !!

ना पिकतय धान जळतय रान
माय नुसतं जातं भरडी,
माय नुसतं जातं भरडी
बघून धरणी माय ओरडी !!

सावकारी रीनं  दुष्काळी जिनं
आली दोरा खाली नरडी,
आली दोरा खाली नरडी
बघून धरणी माय ओरडी !!

उपाशी पोट सुकले ओठ
चाऱ्यासाठी बैल भु खरडी,
चाऱ्यासाठी बैल भु खरडी
बघून धरणी माय ओरडी !!

ये रं पावसा पाव रं नवसा
भर रे रिकामी दूरडी,
भर रे रिकामी दूरडी
बघून धरणी माय ओरडी !!

संजय बनसोडे 9819444028