क्रुर झाड....

Started by Mayur Dhobale, April 04, 2016, 01:25:24 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

क्रुर झाड

वाळवंटी एकदा
एक मुल हरवलं...
ऊन फार डोईवर
भुकेने किती गहिवरलं..

दिसता एक झाड
फळाने  भरलेलं..
भर आशेनं,
झाडामागे पळत सुटलं...

येता मग झाडाच्या पास;
झाड चक्क बोलू लागलं...
" मुर्ख मानवा..
  स्वार्थी दानवा!"
भुतकाळ उकरुन
फळ माथी त्याच्या ,
फोडू लागलं...

कंठ फुटला प्राण खुंटला
लेकरू चक्कर येऊन ,
भुईवर पडलं...
तरी निर्जीव झाड
खुशाल म्हटलं -
" मर तुझ्यावाचुन
माझ कुठं नडलं..."

हळुवार डोळे उघडता,
त्याचच घर त्याला दिसलं...
'सत्य' नव्हे 'स्वप्न' होते
बिछान्यावरच कळुनही चुकलं...
तरी ताडकन् उठता क्षणी ,
आई त्याला म्हणाली -
" काय झालं सोन्या माझ्या ,
  चल बरे, आधी झोप पाहू"

" नको नको मंमी आधी,
एक तरी झाड लावु...
एक तरी झाड लावु "


(Save Trees Save Life)

-   मयुर ढोबळे


https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/