सोबत काही येत नाही...!

Started by Rajesh khakre, April 07, 2016, 10:28:41 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

रोज रोज अनुभवतो मात्र कधी शिकत नाही
सोबत काही येत नाही ध्यानी हे राहत नाही

हे माझं ते ही माझं हव्यास काही सुटत नाही
कितीही कमावले पैसे पोट मात्र भरत नाही

पाप नि पुण्यांचा विचार ही विसरुन जातो
आपला घास हाती तरी दुसर्याचा हिसकावतो

संसाराच्या नावाखाली इतका लाचार होतो
आपले परके स्वार्थापुढे सर्व विसरून जातो

दुसर्याचे सुख ही त्याला कधी बघवत नाही
हसु चेहऱ्यावर आतून मात्र जळफळाट होई

एक गोष्ट मानवा मात्र मनावर बिंबवून ठेव
एके दिवशी तुझा हिशोब करणार आहे देव
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com