दुष्काळ

Started by shrikant dhote, April 08, 2016, 09:39:47 PM

Previous topic - Next topic

shrikant dhote

दुष्काळाचा फास,
घट्ट आवळला,
घास तोंडातला,
गिळला गिळला.............

धराही कोरडी,
नभही कोरडे,
गुरही ओरडे,
पाण्याविना............

रुक्ष झाली धरा,
नाही हिरवाई,
हंबरतात गाई,
अन्नाविण..............

रुसले रे नभ,
पाऊस रुसला,
तराळुन गेला,
लोचनात................

कशी मिटवावी,
घशाची कोरड,
नुसती ओरड,
दुष्काळाची...............

सोकावला काळ,
पुढ्यात दुष्काळ,
जगण्याच बळ,
मिळेल कैसे.............

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
०७/०१/२०१६
shri

Tejal kundur