वास्तव

Started by Minakshi Pawar, April 16, 2016, 10:43:03 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                        वास्तव

                        आजच्या या धावपळीच्या युगात कोणाला कोणासाठी वेळच नाही आहे. नात्यातील संवाद आपुरा असल्यामुळे माणसातील माणसांण मधील दुरावा वाढत चालला आहे. आत्महत्या हे पण एक अपुऱ्या संवादाच कारण असु शकत. सध्याचा ज्वलंत विषय घेता प्रत्युषा हे प्रकरण खूप धक्कादायक आहे . वयाच्या आवघ्या २४ व्या वर्षी तिने आयुष्य संपवले........ त्या मागचे कारण अजून उलगडले नाही.पण विचार करायला लावणारी बाब म्हणजे आसे काय घडले कि तीला हे असले पाऊल उचलावे लागले ? ती तर एक प्रख्यात अभिनेत्री होती .......... पैसा ,प्रसिद्धी ,सौंदर्य हे सगळ असुनही तिने असे का केले ? चर्चेत असल्सा प्रमाणे तिने तिच्या boyfriend मुळे केल्याचे दिसून येते......... असो ह्या सगळ्यातून हेच सांगायचं आहे कि आपल्या माणसांशी संवाद साधला problems share केले तर............ अशी वेळ कोणावरच नाही येणार.
                      आज आकडा बघता 18- 24 ह्या वयात सगळ्यात जास्त आत्महत्या घडून येताना दिसतात. जगभरात प्रत्येक 100-200 मिनिटांत एक तरुण / तरुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. जर विचार केला तर social networking  हे पण ह्या सगळ्याला तितकेच जबाबदार आहे! जरी असं वाटत असेल की chatting मुळे आपला एकटेपणा दूर होतो पण ते नेमके ह्याचा उलट होतं असते....... कारण chat करतांना फक्त चांगल्या घटनांचा उल्लेख होत असतो. मग मनातले दुःख व्यक्त करायला जागाच राहत नाही. त्यामुळेच एकाकी पणा वाढत जातो. तासंतास केलेली chatt आणि  5 मिनिटांची समक्षभेट ह्यात खूप फरक आहे . ती भेट मनाला एक  वेगळाच आनंद देऊन जाते . पण आत्ताच्या या परिस्थितीत अस क्वचितच घडत......... Chatting  मुळे गैरसमज वाढतात कारण एकमेकांचे हावभाव कळत नाही या उलट भेटल्यानी दुरावा कमीहोतो....... Smart phone  मुळे जग जवळ आले हे नक्कीच पण माणसं दुरावली हे वास्तव आहे.
                      जग खूप वेगाने पुढे जात असलं तरीही  जर आपल्याला जर आपल्या  माणसां साठी वेळ नसेल तर त्याचा काहीएक उपयोग नाही......... कारण नाती एकदा दुरावली कि ती सावरता येत नाहीत. एकमेकांची सुःख दुःख  वाटून घेतली कि आयुष्य खूप सोप्पं होतं. ते जगण्याचा पुरेपूर आनंद पण घेता येतो. Problems  सगळ्यांना असतात पण म्हणून आत्महत्या हे त्याच solution असू शकत नाही.
                     परीक्षेत नापास झालो म्हणून आत्महत्या करण्यापेक्षा  परत तितक्याच जोमाने अभ्यास करून अव्वल येण्याची ताकद असावी ह्या साठी कुटुंबाची मदत आवश्यक आहे आणि त्या साठी संवाद महत्त्वाचा. प्रेमभंग झाला म्हणून खचून गेल्या पेक्षा ज्या व्यक्तीने ते केले त्याला उत्तर म्हणून आयुष्यात यशस्वी झालं पाहिजे!!! आपण कस वाईट आहोत आपल्या हातून काहीचहोत नाही , आपण सुंदर नाही , ह्या सगळ्याचे नैराश्य बाळगून आत्महत्या केल्यापेक्षा, मी कसा चांगला आहे , किती लोक माझ्यावर प्रेम करतात, मी काय करू शकतोअसा विचार केला पाहिजे आणि स्वतःला proof केल पाहिजे ............

                  कु. अंजली पवार
             pawaranjali416@gmail.com

mohit1502

लेखनाचा विषय छान  आहे ... विचार करण्या सारखा आहे पण । तुमचा लेख अपूर्ण वाटला मला

Minakshi Pawar

Thank you for your feedback pudhlya veles nakkich me hya goshtichi dakhal gheil