ऊन....!!!

Started by Ravi Padekar, April 19, 2016, 10:54:57 AM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

 ऊन....!!!

तापलीया भुई,
पाय नाचती थुई थुई
राहावे किती क्षण उभे,
उदास मातीत जाई जुई

पवन देव सुट्टीवर,
तरीही दिसती उन्हाच्या झळा
पाणी पाणी पिऊन राहिला
कोरडा आतून गळा

कधी चढतो, कधी उतरतो
सूर्याचा अपुला पारा
उभे राहून सावलीशी,
कधी झाड बनती आसरा

अंग ओले घामाने, केली
अंगाची सार्‍या लाई
घरा बाहेर पडावे कसे,
खेळण्यास अनवाणी पाई

उष्ण अशा रागाला थंड कसे करावे
नभातल्या तापत्या सूर्यावर पाणी थोडे ओतावे

पेटून उठला ज्वाळ याचा
उठला कल्लोळ मनातुनी
थबकत झोपेत चालली पाऊले
घेतले पाणी जग भरूनी...

फेकले त्या सूर्यावर
पाणी दिले ओतून,
दचकून उठले बाबा,
त्यांच्या पाणी चेहर्‍या वरून.
दचकून उठले बाबा,
त्यांच्या पाणी चेहर्‍या वरून.....

कवि:- रवी पाडेकर (मुंबई)


Ravi Padekar