मी तोच...

Started by Kunal bhoir, April 22, 2016, 12:34:29 PM

Previous topic - Next topic

Kunal bhoir

मी तोच, मी तोच,
जो तूला स्वप्नातूनी पहात होतो.
नकळतच तूजला मनोमनी चहात होतो.

मी कसा पूरताच भूललो होतो तूला.
मी कसा आपसूक विरलो होतो तूला.

पूरता दिवाना मी, परी तूजला ना ठाव होते.
विसरलोच होतो, कोण मी अनं काय माझे गाव होते.

सांगावयास तूजला, प्रयत्नांची मी शीकस्त केली.
पण तू माझी, हर अर्जी बरखास्त केली.

कसे समजाऊ तूला, हे मोठे कोडेच होते.
मला तूजवर न्हेणारे, मार्ग थोडेच होते.

कवितेतूनी लिहावे, दूसरे आता उरलेच नाही.
वर्णावे तूजला, परी शब्द मला पूरलेच नाही.

©Kuna!!! Bhoir
9158870372