गवसेल का माणुसकी

Started by meenakshi mali, April 23, 2016, 02:23:44 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

नवं जुनं करत
आयुष्य सरत जातं
क्षण न् क्षण
परकं होऊन जगावं लागतं
नवं आलं की बंद
पडलेल्या वस्तूला फेकावं तसं
माणूस माणसाला फेकून देतो
जगणं नकोसं होतं
माणुसकी गवसते का कुठ
शोधत रहावं लागतं
भावना शुन्य जगात
पैसा झालाय महान
आई बाप भाऊ बहीण
नाती झालीत लहान
कसं जगावं जगात
प्रश्न पडतो
उत्तर मात्र हरवलेलं असतं
आधाराची अपेक्षा नका ठेऊ आता
आई बाबांनो कारण
कुणाचा नटसम्राट व्हायला नको
रक्तातलं जरी असलं आतडं
आपलेपण आटलंय आता
मायेची ऊब आता
कुणाला नकोशी होते
कोणाला कसलेच बंधन नको वाटतं
आठवणी तशाच पाठमो-या होत जातात
हरवत अन् विरत जातं प्रत्येक नातं
कोणीच कोणाला नकोसं असतं
प्रायवसीच्या नादात मायेनं 
बांधलेलं सांधलेलं घरटं तुटलेलं असतं

-Meenakshi