थांब थोड्या वेळ ...!!!

Started by Kunal bhoir, April 24, 2016, 11:30:31 AM

Previous topic - Next topic

Kunal bhoir

थांब थोड्या वेळ जरा डोळे भरून पाहुदेत,
उन्हाने चमकनारी आकृती तुझी माझ्या आठवणीत राहुदेत.

लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे अशी पाहू नकोस,
उगाच थरथर्त्या जिवाला अजुन घोर लाऊ नकोस.

आता ना तू केस बांधून घे,
तो वारा जरा जास्तच खेळतोय.
तो तुझ्या इतक्या जवळ का?
याच मला रागच येतो.

तू का रागावतेस? तू हस ना आधीसारखीच,
कपालावरची टिकली आणि गालावरची खळी शेवटी सरशीच.

तुझा तो समुद्राच्या लाटाना हातात घेण्याचा प्रयत्न,
असाच चालू राहुदेत.
उन्हाने चमकनारी आकृती तुझी माझ्या आठवणीत राहुदेत.
उन्हाने चमकनारी आकृती तुझी माझ्या आठवणीत राहुदेत.

© कुणाल भोईर
9158870372