* मग प्रेम करु कोणावर *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 27, 2016, 09:59:47 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


वाटे ओवाळुन टाकु
जीव हा तुझ्यावर
पण साला भरवसा
राहिला नाही प्रेमावर
     मग प्रेम करु कोणावर...
करत नाही कुणी
खरं प्रेम कोणावर
जो तो येई जवळ
करण्या घाव काळजावर
     मग प्रेम करु कोणावर...
तुटली सारी नाती
गेले सारे दुर
आपले म्हणनारे मला
आहेत कुठे यार
    मग प्रेम करु कोणावर...
गेलो देवा भेटाया मंदिरात
ठेवला माथा पायावर
पण फुटतो का कधी
सांगा दगडाला पाझर
    मग प्रेम करु कोणावर
खाऊन ठेचा हजार
घायाळ झालं शरीर
तेव्हा कुठे उमगलं
प्रेम राहतंच रेअधुरं
    मग प्रेम करु कोणावर...
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938