अनोळखी कविता

Started by विक्रांत, April 28, 2016, 11:21:29 PM

Previous topic - Next topic

विक्रांत




गाडी चालवत असतांना सुचलेल्या कविता
वाऱ्याबरोबर उडून जातात
जरी ती क्षण चित्रे नंतर पुसटशी आठवतात
काही शब्द मनात  उगाच तरळून जातात
काही स्वर विरल्या शब्दावर ठेका धरतात
पण ती आता आपली नसतात
बऱ्याच वेळा हायवे वरून जातांना
अश्या माझ्या असंख्य कविता
मला पाहत असतात
अन मी हि त्यांना असतो न्याहाळत
एक दुबळा यत्न करीत
त्यांना त्याच शब्दात पुन्हा मांडण्याचा
जुन्या आठवणीतील फ्रेममध्ये  ठेवण्याचा
पण त्या रहातात तश्याच तटस्थ दूरस्थ
ओळख पुसलेल्या अनोळखी
दुरावलेल्या  प्रेयसीगत
एक खंत जागी ठेवत मनाच्या खळग्यात


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/