ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 29, 2016, 10:49:59 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

!!!""देव कुठे आहे""??

माझे काही प्रश्न आहेत
कोणी उत्तर देईल का?
          देवधर्म मानेल मी,फक्त
          कोणी देव कुठे दावेल का?

हिंदू मुस्लिम शिख ईसाई
धर्म आहेत अजून काही
           धर्म भेद माणसात होईल
           देवाला कसे समजले नाही,?

पण काही सांगतात हा भेद
इथे माणसाने निर्माण केला
           धर्माची निर्मिती करून त्याने
           हा भेदसंघर्ष निर्माण केला,!

मग इथे माणूस ही देवाच्या
नियंत्रणात नाही समजू का?
            मंदीर मस्जिद गिरजा सारे
            माणसाने बनवले समजू का?

चला देव इथे पृथ्वीतलावर
मग दुसऱ्या ग्रहावर का नाही?
             जिथे माणूस पोहचत नाही
             तिथे देवाचे नामोनिशान का नाही?

कोणी मंदीर कोणी गिरजात
कोणी मस्जिदीत जात नाही
              ज्याचा त्याचा इथे देव अलग
              तो कोणाला का दिसत नाही?

तरी देव पाहिला मी सांगणारे
ह्या जगात काही कमी नाही
            चला मानून घेऊ त्याचे बोल
            मग ते पुरावा का देत नाही?

जेव्हा निरपराधांची हत्या होते
स्त्रीयामुलींचे बलात्कार होतात
             देवस्थानी चेंगराचेंगरीत मरतात
             तेव्हा हे सारे देव कुठे असतात?

जेव्हा दुष्काळात जीव तरसतात
पहा अवकाळीने स्वप्ने तुटतात
             अरे कित्येक जीव बेघर होतात
             तेव्हा हे सारे देव कुठे असतात?

मला कोणाच्या भावना
बिलकुल दुःखवायच्या नाही
             मला फक्त देव कुठे आहे
             हे शोधायचे आहे तर सांगा ना,!,!
!!''''देव कुठे आहे ??,,!!

ललित कुमार
wapp-7744881103
-----------------------------------