ऊन्हाळी प्रेम

Started by vishal maske, April 30, 2016, 09:50:00 AM

Previous topic - Next topic

vishal maske

***** ऊन्हाळी प्रेम *****

भर ऊन्हामधी मी
वाट तुझी गं पाहतो
तु ना दिसता दुरवर
जाळ काळजात होतो

अशी आस ही  मनाला
सखे तुझी गं लागली
काळजातं खोलवर
प्रीत तुझी ही जागली

जीव तुटतो तीळ-तीळ
याद तुझी ही घेताना
मनी दाटते काहूर
विरह तुझा हा पिताना

का तु दुर गं माझ्या
मी का दुर गं तुझ्या
तु ना दिसते आस पास
झाल्या सावल्या खुज्या

कुण्या क्षितिजाच्यापार
सखे दडलीस तु
तार माझ्या गं मनाची
आज छेडलीस तु

तु ना येता आस-पास
देते तुझा भास हा
स्तब्ध होतं माझं मनं
आणि फूलतो श्वास हा

राहू नको दूर दूर
आता ये ऊन्हात गं
प्रेम माझं हे ऊन्हाळी
घे तुझ्या मनात गं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता आवडल्यास नावासह शेअर करण्यास परवानगी