आज परत

Started by shamtarange, April 30, 2016, 05:31:29 PM

Previous topic - Next topic

shamtarange

आज परत तू सुंदर दिसत होतीस
बघून मला मंद मंद हसत होतीस...
जाणविले तुलापण , मनातली प्रशंसा
म्हणूनच तू घेताले, शर्मावून
स्वतःला
नयन तुझे बोलके , विचारतात ते मला
आज तरी शब्द दे, तू माझ्या
स्तुतीला
तुझ्या बोलक्या डोळ्यांनी , मला
रोज बोलतेस
कि " होकाराला माझ्या , तू का वेळ
लावतोस ? "
मला सुद्धा वाटते , बोलावे तुला
मनातले
ओठावरच थांबतात , शब्द माझे
ओठातले...
एक दिवस देईन मी , शब्द माझ्या
भावनांना
तेव्हा सांगेन मी तुला, मनातल्या
संवेदनां...
http://marathikavy.wardpress.com