गरिबीच्या गारा

Started by shetye_pranav, May 02, 2016, 12:08:54 PM

Previous topic - Next topic

shetye_pranav

गुणवत्ता कामी केव्हा येईल सांगा,
कधी संपतील या कठोर रांगा?
मेहनतीच्या धारा अंती संपतील जेव्हा,
पाझर या डोळ्यांना फुटतील तेव्हा...

कष्टाचा वारा जीवन-अंगणात येईल,
दूर त्या यश-देशी मज तो नेईल.
प्राणवायू मजपाशी उरेल फक्त काही,
यांत्रिक कळपात आता माणुसकीही उरली नाही.

दोन पैश्यांसाठी खेळ मांडला सारा,
तरीही स्थिर नाही डोक्यावरील निवारा,
सोबत्यांची साथही नाहीशी झाली,
सरते शेवटी बात कमाईवर आली.

दारोदारी भटकून पसरला फाटका हात,
निद्रेस जाता कर्जात डुबली हि रात.
तडजोडीच्या तापमानाचा वाढतच गेला पारा,
मनातील आनंदी पिकांवर पडल्या गरिबीच्या गारा...

-प्रणव शेट्ये