ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, May 03, 2016, 09:25:25 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

किरकोळ गोष्टीला आम्ही
खुप मोठे करून सांगतो
जे बोलन गरजेचे असते
ते तर कळून ही टाळतो,!

कानात मळ नसला तरी
तो कान कोरून काढतो
विषयात दम नसला तरी
त्याला दिवसभर चाळतो,!

ती कालची गरम भाकर
आज शेळी म्हणून सोडतो
डब्यातले पिठ सरले मग
ती शेळीच भाकर तोडतो,!

दोन कुत्रे भूकत असता
तिसरा विनाकारण कुदतो
दोन्ही विचारते झाले त्याला
तो शेपूट आवरून पळतो,!

अशीच गत आमची आज
महत्त्व नसे त्या महत्त्व देतो
महत्त्वाचे असते तेव्हा मग
पहिले पळवाट शोधून घेतो,!

म्हणून लल्या म्हणे,,,

महत्त्व मुद्दावर चालन शिका
महत्त्व मुद्दावर बोलन शिका
पहा वेळ जातोय वाया आता
महत्त्व मुद्दावर जागन शिका,।,

ललित कुमार
Wapp-7744881103
*****************