देव अस्तित्वात आहे की नाही....

Started by Pranav dhaigude, May 06, 2016, 06:58:49 PM

Previous topic - Next topic

Pranav dhaigude

लेख - प्रणव धायगुडे

काल माझी एक मैत्रीण आणि मि मराठी सिनेमा पाहुन सिनेमागृहातुन बाहेर पडलो. सिनेमातील अनपेक्षित शेवट पाहुन दोघांमध्येही शांतता पसरली होती. (कदाचित आमच्या दोघांच्याही डोक्यात तो सिनेमाच घोंघावत असावा) ति अवसरी ला राहनारी कारपोरेशनचा भाग फारसा तिला परिचित नसल्याने ति माझ्या बरोबरच चालत होती.......

बराच वेळ असाच शांततेत गेला, आम्ही बरोबर तर चालत होतो पण एकमेकांशी बोलत नवतो. चालता चालता मला समोर एक उसाच्या रसाचा गाडा दिसला, तस मि तिला हळूच त्या गाड्याच्या दिशेने खुनावल, तस ति ही त्या गाडयाच्या दिशेने चालु लागली (कदाचित तिला माझी खुनवलेली अबोल भाषा समजली असावी) गाड्या जवळ पोहचताच आम्हाला रसवाल्या काकानी 2 ग्लास दीले.....

रस पिता पिता ति डोळयावरील केस कानामागे टाकत म्हणाली, movie चा End खुपच Unexpected होता ना उगिचच माझा mood off झाला, मि हसतच तिला म्हणालो अरे तो movie होता रियल थोडीच होत एवढी काय involve होतीयेस त्यांच्यात, तू पण जनारेस काय अस पळून (तिला हसवण्याच्या हेतुने थोड़ मस्करित बोललो) तिने मला प्रति उत्तर देत लगेच बोलली bt real lyf शी related होत ना यार , मि  ही तीजी समजुत काढत म्हणले चल जाउदे सोड आता

बोलता बोलता आमचा रस ही संपत आला तोच ती म्हणाली आपण त्या समोरच्या मंदिरात जाऊ थोड़ा वेळ बर  वाटेल (सिनेमामुळे तिज्या मनात झालेला कल लक्ष्यात घेता मि ही नकळत होकारार्थी  मान डोलावली) मंदिरा जवळ पोहचताच ......
मि- मंदिरात जायच टाळत म्हणल तू जा पाया पडून ये मि बाहेरच थांबतो
ति- का रे चल की
मि-अरे मि दररोज इथुनच जातो दररोज पडतो देवाच्या पाया
ति- ok as your wish


( मंदिरातून बाहेर पडत प्रश्नानार्थक नजरेंन माझ्याकडे पाहत  तिने विचारल) तू मंदिरात का नाही आलास
मि- असच
ति-असच कस... तू असच काहीच करत नाहीस.. काहितरी कारण असेलच ना (माझ्या विचित्र वागण्या पठिमागच कारण जाणून घ्यायची आतुरता तिज्या सुंदर चेहर्यावरती स्पष्ट दिसत होती)

(मि काही स्पष्टीकरण देण्याच्या अवस्थेत नवतो पण तिज्या सुंदर चेहर्यावरील अतुरतेला भाळुन नकळत तोंडातून शब्द सुटला)
मि- विश्वास नाही माझा देवांवर....
ति-का.... माझा तर आहे बाबा
मि- याच मंदिरात खुप दिवसांपूर्वी काहीतरी मागितल होत... पण ति भेटण्या एवजी मझ्याकडून हेरावली गेली म्हणून नाही ठेवत मि विश्वास.... देव असता तर अस नसत घडल
ति- माझ्याशी ही असच घडत पण मि ठेवतेच् ना देवांवर विश्वास मग... देव आहेत की नाही काय माहीत पण श्रद्धा असावी रे अस म्हणत तिने तीजी बाजू मांडली


मि- मि ही हसतच तिला म्हणलो ज्याच्या पासून काहीच मिळत नाही... जो अस्तित्वात आहे की नाही हेच माहीत नाही त्यावर काय विश्वास आणि श्रद्धा ठेवायची
ति- मग तू स्वार्थी आहेस
मि- देव ही स्वार्थी आहे ना मग... आपण जेव्हा त्याज्या पाया पडतो त्याज्यापशी नाक रागड़तो तेव्हा तो आपल्या जे हवय ते देतो

बराच वेळ बस स्टॉप वरती आमचा वाद चालू होता.... सिनेमा पाहुन जि मुलगी शांत शांत बसली होती  ति आता माझ्यावरती प्रश्नाचा भाडिमार करत होती (कदाचित सिनेमातील अनपेक्षित शेवट ति आता विसरली असावी )पण काही निष्पनंच नव्हत होत... शेवटी मिच कंटाळून तिला म्हणालो जाउदे देव असेल किंवा नसेल.... असला तरी आणि नसला तरी माझा देवारती विश्वास नाही... आपन कश्याला उगीच वाद करायचय यावर उगीच तेवढ्यात बस ही आली आणि ति BYE म्हणत पटकन बस मध्ये बसली मि तिझ्या पाठमोऱ्या आकृतिकडे बघतच बसलो

मि ही घरी जायला निघलो पण आता मि एकटाच असल्याने माझ्याही मनात एक विचार सारखा घोंघावत होता....खरच देव असेल का ?? (कदाचित मि माझ्या मतावरती ठाम नसेल) आणि जर असेलच तर मग माझ्या बरोबरच  अस का करतो