हॉस्पीटलमधून डिस्चार्ज

Started by shardul, December 25, 2009, 09:24:03 PM

Previous topic - Next topic

shardul

जिम आणि मेरी दोघंही मेंटल हॉस्पीटलमधे पेशंट होते. एक दिवस ते जेव्हा हॉस्पीटलच्या स्विमींग पुलशेजारुन चालत होते तेव्हा जिमने एकाएकी स्विमींग पुलमधे उडी मारली. स्विमींग पुल खुप खोल असल्यामुळे तो बुडून स्विमींग पुलाच्या एकदम तळाशी गेला. मेरीने हे सगळं पाहालं आणि तिने ताबडतोब त्याला वाचवण्यासाठी स्विमींग पुलमधे उडी मारली. ती पोहत तळाशी गेली आणि तिने जिमला धरुन वर आणले आणी स्विमींग पुलाच्या बाहेर काढले.

जेव्हा मेडीकल ऑफीसरला मेरीची ही करामत कळली त्याने ताबडतोब मेरीला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्याची ऑर्डर दिली. कारण ती जर एवढं शहानपणाने वागुन जिमला पाण्यातून बाहेर काढून वाचवू शकते म्हणजे ती आता मानसिकरित्या दुरुस्त झाली असं समजायला काही हरकत नव्हती.

जेव्हा तो मेडीकल ऑफिसर मेरीला भेटायला गेला तेव्हा म्हणाला, '' मेरी माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे... चांगली बातमी ही आहे की तुझी ती जिमला वाचवण्याची कामगीरी पाहून आम्ही तुला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्याचे ठरविले आहे... आणि वाईट बातमी ही आहे की तु ज्याला वाचवले होते त्या जिमने स्वत:च्या गळ्याला फास लावून आत्महत्या केली आहे...''

मेरीने उत्तर दिले, '' नाही त्याने गळ्याला फास लावला नाही... मीच त्याला वाळवण्यासाठी टांगले होते.''

rudra


santoshi.world