बालपण

Started by Dnyaneshwar Musale, May 15, 2016, 10:07:56 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

पुन्हा ते बालपण यावं ,
सायकलच्या मधल्या
नळीमध्ये पायटाकुन 
मनसोक्त फिरणं मिळावं,
गोट्यांच्या डावामधुन नव्या
मित्रत्वाच नात जुळाव,
पुन्हा त्या ओढाच्या
कडेला जावं ,एखादा
आंब्याचा पाड गलुरीच्या
दगडान पाडावं,
जुन्या गोष्टीच्या
पुस्तकांचं याड जडावं ,
मनासारखं काहीतरी
करावं,
लंगडीच्या डावात मधींच
घुसावं,
त्यातच आपल्या साठी
कोणीतरी हसावं,
त्या चिमण्या पाखरांच्या
प्रेमात पडावं,
लव्हाळी सारख
लवचीक बनावं,
खरचं असं काहीतरी
पुन्हा विपरीत घडावं,
रुसणं ,फुगणं आईला
कळावं,
डोळ्यातलं पाणी माईन
फुसावं,
खरचं असं हे बालपण
पुन्हा मिळावं ,
खरचं पुन्हा मिळावं.