वाट...

Started by गणेश म. तायडे, May 16, 2016, 08:30:31 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

चांद डोईवर, आसमंत शांत आहे
निद्रेच्या कुशीत सारे जग निवांत आहे
दुरवरच्या डोंगरावर रेंगाळणारे ढग
जणू पर्वतांवर अलगद प्रेम करत आहे
मनात अपेक्षांचे, वादळ उरात घेवूनी
तुझ्या पाऊलांची निरागस वाट पाहत आहे...

रोजच्या सारखी चांदणे शिंपलेली गगणी
सकाळच्या उजेडात हरवूनी जात आहे
तुझ्या विरहात उडालेली झोप डोळ्यांची
आठवूनी सहवास, रात्र उजळत आहे
ऋतू प्रेमाचा बघ कसा बहरला आहे
ये परतूनी प्रिये, तुझीच वाट मी पाहत आहे...

- गणेश म. तायडे,
    खामगांव
    ganesh.tayade1111@gmail.com

gopal kawaskar

आज मला रडण्यावर्ती हसु येतय.....

गर्दीत मी एकटा पडलोय साथ कोणी देणार का ?
दुक्ख माज्या वाट्याची वाटून थोड़ी घेणार का ?
घर सुटलं माणसं सुटली आज सगड़ी नाती तुटली,
प्रयत्न इथवर करुण सुद्धा आयुष्याची गाडी सुटली.
आज मला रडण्यावर्ती हसु येतय......
आता मार्ग जिथे घेऊन जाईल निवांतपने निघून जाईल ,
थोड़ा थोड़ा जळत आता अनंतात वीरून जाईल .
पण नाही.....! थोड़ी आशा बाकी आहे, स्वप्नं अजुन संपलं नाही ,
मेहनतीचं गालं मी अजुन तरी जुंपलं नाही .
काय विचार केला होता पण व्यर्थचं सगळं घडलं ,
मी पाहलेलं गोड स्वप्न खुप महागात पडलं .
आज खरंच मला रडण्यावर्ती हसु येतय
कवी- गोपाल कावस्कार-                                १९-०५ -२०१६
गुरूवार