वचन

Started by anuswami, May 19, 2016, 08:53:46 AM

Previous topic - Next topic

anuswami

वचन

वळणावर आलोय कोणत्या आता
जाणुनही अजाण वाटतंय सगळ
दिवस सरलेत सारेच आज
नवीन नात फुललंय ते जगावेगळ


निसटतय का हातून काही
विचार करून, रडून मी सावरलो
आठवणीत बुडालो त्याच पुन्हा
नकळत गुंतलो अन बावरलो


ढासळलोय सखे मी खुप
आणि घावही पुन्हा सहवेना झालेत
शेवट दिसतोय डोळ्यांसमोर
बरेच हात मदतीला आलेत


बरसणारा पाऊस नि गर्द काळोख
सोबत आठवण तुझी दाटून येते
सोबतीचे ते दिवस सुखाचे, प्रेमाचे
सर्वांचीच एक झलक देऊन जाते


जगाला कधी समजणार नाही
नातं तुझ माझ काय असाव
तुझ्या हृदयाच्या ठोक्यातून आणि
प्रत्येक श्वासातून ते दिसाव


दुःखी झालोय मी खुप सखे
तुझा हात आता सोडतो आहे
मी तुझ्या विरहातही
आता आनंदाने रडतो आहे


सोबत तुझी सुटताना
हा बंध अजुन घट्ट होईल
जाणीव कमी करू नकोस
आपली मैत्री अबाधीत राहील


हे दान आहे इश्वराच अन् मैत्रीच
आता काळजात आहे नवीन जाग
एक आवाज तुझा, मैत्रीचा
करतो मी आता सर्वस्वाचा त्याग


या काळजातली तुझी जागा
नेहमी तुझीच राहील सखे
शब्दांचा हा हार अर्पितो
अनावर भावना नि शब्द झाले मुके


सखे,
गहिवरणारा काळ तो संपला
आठवणी तुझ्या या भेटीत घेऊन जा
मी आनंदी राहीनच
पण तूही आनंदी राहशील
एवढंच वचन देऊन जा.....!!!!!


- अनू
asswami0143@gmail.com