सैराट

Started by बुद्धभूषण गंगावणे, May 20, 2016, 11:33:20 AM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

सैराट
प्रेमाच्या कोमल भावनेचा उदय होणे
आणि त्या भावनेत आयुष्य "झिंगाट" होऊन जाने
म्हणजे सैराट.
आयष्याला प्रेमाचे "याड लागणं"
आणि त्या भावनेत मन धुंद होवून जाण
म्हणजेच सैराट.
प्रेमासाठी दिवस रात्र जागण
प्रेम दिसल्यावर उगाचच लपण
म्हणजेच सैराट.
प्रेमामध्ये वेगळाच आयुष्य जगणं
आणि मित्रांच्या साथिने सगळं सोपे करून बघण
म्हणजेच सैराट.
मित्रांचा साथिने सार्‍या जगाशी लढण
पण संकटाच्या वेळी त्यांचा सावलीत दडण
म्हणजेच सैराट.
जगाची  नजर चोरून आपला जग बनवणं
पण ते जग चालवणसाठी कसलाच अनुभव नसणं
म्हणजेच सैराट.
वास्तवा मध्ये संसाराशी संबंध येणं
संसाराला प्रेमाच्या साथिने न्याय देन
म्हणजेच सैराट.
खोट्या जातिवादात खोट्या प्रतिष्टे साठी
खर्‍या प्रेमाचं खरया प्रेमींचा बळी देणं
म्हणजेच सैराट.
रक्ताने भरलेल्या चिमुकल्या पायांच्या ठश्या मध्ये
सुन्न झालेली समाजाची मने थर्‍यावर आणणे
म्हणजेच सैराट.



Ravi Padekar

#1
"सैराट झालं जी"

सैराट म्हणजे
प्रेम या कोमल भावनेचा हळूच उदय होणं
दिवसरात्र प्रेमासाठी 'झिंगाट' होऊन जाणं

सैराट म्हणजे प्रेमाचं "याड" लागणं
प्रेमाच्या मधुर भावनेत गुंगून जाणं

सैराट म्हणजे बेधड़क प्रेम करणं
प्रेम मिळवण्यासाठी जगाशी लढणं

जगाचे नियम झुगारुन आपल्या रस्त्याने चालणं
पदोपदी ठोकरा खात रक्तबंबाळ होणं

सैराट म्हणजे मैत्रीची अमूल्य साथ
दिवा जळत राहावा म्हणून झालेली वात

सैराट म्हणजे कुटुंबाची वाताहत होणं
प्रेमाची सजा जणू सर्वानीच भोगणं

दुनियेच्या नजरेआड घरटें आपलं थाटणं
जीवनाशी लढ़ताना अनेक तडजोड़ी करणं

सैराट म्हणजे चटके बसल्यावर भानावर येणं
आपणच उचललेलं पाऊल पुन्हा चाचपुन पाहणं

सैराट म्हणजे वास्तवाचा संसार आणि संसारातला संशय
नाहक येणारा गैरसमज अन नात्याचा कंप

सैराट म्हणजे प्रेमालाही उतरती कळा लागणं
अन जपलेली प्रेमाची जागा तिरस्काराने घेणं

सैराट म्हणजे दुरावा अन दुराव्यातला ओलावा
मात्र खरं प्रेम आटत नाही त्याचा ही पुरावा

सैराट म्हणजे अनामिक जिद्द प्रेम टिकवण्याची
सैराट म्हणजे पाय घट्ट् मातीत रोवण्याची

सैराट म्हणजे संघर्ष जगण्यातला
माणसातल्या नात्याचा अन नात्यातल्या जातीचा

सैराट म्हणजे संघर्ष लहान मोठ्या मनाचा
मानलेल्या जपलेल्या खऱ्या-खोट्या प्रतिष्ठेचा

सैराट म्हणजे प्रेमासाठी सर्व उधळून देणं
सैराट म्हणजे प्रेमासाठी एकरुप होणं

सैराट म्हणजे सुड मनात रुतलेला
प्रतिष्ठाच्या आवरणात घट्ट गुंडाळलेला

सैराट म्हणजे रक्ताळलेली पावलं जनमनावर उमटलेली
सुन्न झालेली सैराट मने थार्यावर आलेली

सैराट नाही प्रेमाचे अपयश ते तर अपयश मानसिकतेचे
प्रेमाला कुठलाय जात पंथ ते तर अपयश सामाजिकतेचे

सैराट प्रेम, सैराट गोडवा, सैराट जगणं,सैराट मरणं

असं मरणं की मरणाने ही हळहळावं क्षणभर
प्रेमाचं महत्व त्यालाही कळावं मणभर

मरणाने ही व्हावे बेभान जणू अन उसळून त्याने ही म्हणावं
"सैराट झालो जी"
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

(कविता forward करायची इच्छा झाल्यास कविच्या नावासाहित forward करावी)

ही कविता चोरली असून मुळ्कवी राजेश खाकरे आहे...
कविता बनविण्यासाठी खूप विषय आहे फक्त सैराट हा विषय नाही...
कृपया आपण आपल्या स्व-लिखित कविता पोस्ट कराव्या

बुद्धभूषण गंगावणे

कविता चोरलेली नाही आहे फक्त त्या कवितेचा आढावा घेऊन ही कविता लिहिलेली आहे कवितान मध्ये साम्य आहे . पण  पहिल्यांदाच कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे येवढा काही अनुभव नसल्या मुळे ही चूक घडून आली त्या साथी मी क्षमस्व आहे . पण माझी पुढची कविता नक्कीच तुम्हाला आवडेल याची मी ग्वाही देतो . धन्यवाद आणि कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करावी...

Ravi Padekar

तुमची ही पहिलीच कविता होती, काही हरकत नाही, आम्ही उत्सुक आहोत तुमच्या नवीन कविता ऐकण्यासाठी... शुभेच्छा पुढील कवितेसाठी

बुद्धभूषण गंगावणे

धन्यवाद आमच्या सारख्या नवीन शिकाऊ कवींसाठी तुमच्या शुभेच्छा खूप मोलच्या आहेत माझा उत्साह वाढवण्यासाठी खूप धन्यवाद माझी पुढील कविता तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद ....