प्रेम...........एक सुंदर भावना - part 2

Started by dip.21484, May 21, 2016, 04:28:10 PM

Previous topic - Next topic

dip.21484


दुसरया दिवशी तिने संध्याकाळी साधारण ६-७ वाजता त्याला SMS केला हे जाणून घेण्यासाठी की तो सुखरूप पोहचला की नाही? त्यावेळेस तिला काहीच reply नाही आल़ा. रात्रि उशिरा तिला एक SMS आला.....तो SMS त्याचा होता. तिने तो वाचला आणि ती थक्कच झाली. त्यात लिहिल होत की ''that day i could not sing properly only because of you. i was unable to concentrate on song. why you did this with me ??? ''. She was completely shocked. तिला काहीच कळत न्हवत की त्याला के म्हणायचे ते. तिला वाटल की नेहमी प्रमाने कोणाचा तरी राग तो तिच्यावर काढत असेल. तिने काहीच reply नहीं केला त्याच्या ह्या SMS चा.


असेच कही दिवस गेले. दरम्यानच्या काळात ना त्याने तिला SMS केला ना तिने त्याला कधी contact करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस अचानक तिला त्याचा फ़ोन आल़ा. स्क्रीन वर flash होणार नाव वाचून तिला कळेना कि फोन घ्यावा कि नाही........तिने फोन receive केला. तिने ''Hello'' केल. पलीकडून काहीच आवाज आला नाही आणि म्हणून तिने थांबून पुन्हा ''Hello'' केल. पलीकडून त्याने हि ''Hello'' केल. क्षणभर दोघ हि शांतच होती. तो म्हणाला,''I know you are angry with me. लेकीन हम काम के लिये तो at least बाते कर सकते हे ना? just forget all those things'' ती फक्त ऐकत होती, त्याच बोलन पूर्ण झाल्यावर तिने त्याला ''ठीक हे'' अस म्हटलं आणि ''और क्या काम हे?'' अस विचारलं. त्यांच कामाच बोलून झाल्यावर दोघांनीही फोन ठेऊन दिला.


पुढे ३-४ वेळा त्यांच कामासाठी बोलण झाल. काही दिवसांनी त्याने resign केल आणि चेन्नई तच नवीन जॉब जॉईन केला. एकदा तिला एका अनोळखी नंबर वरून कॉल आला. तिने इकडून ''हेल्लो'' केल, पलीकडून ''हाई, पेहेचाना'' असा प्रश्न आला. खरतर तिने त्याचा आवाज ओळखला होता पण ती संभ्रमात होती कि हा नक्की तोच आहे का कारण मध्यंतरीच्या काळात त्याचा काहीच संपर्क न्हवता. तिने उत्तर देण्या आधीच समोरून त्याने त्याच नाव सांगितलं. तिला खरतर खूप आनंद झाला पण तिने तस त्याला दर्शवल नाही. पुढे अधून मधून त्यांचं बोलन होई, कधी SMS ने तर कधी कॉल वर.


एके दिवशी त्याने तिला एक SMS पाठवला, जनरल SMS होता तो पण तरी हि तिला थोडस वेगळ वाटल तो SMS वाचून. त्याच रात्री त्याचा परत SMS आला, त्याने विचारलं ''are you slept?'' तिने reply दिला ''NO'' ....
तो: can we talk?''
ती: yeah, sure.
तो: '' I miss you a lot ''
तिला काय आणि कस react कराव हे कळेना..... तोवर त्याचा परत एक SMS आला....
तो: ''if someone proposed you?'' 
तिला अक्षरषः धडधडायला लागल त्याच्या ह्या प्रश्नाने......तरी हि तिने धीर एकवटून विचारलं
ती: ''I am not getting you.... what you want to ask? ask clearly''
तो: ''I love you.........really I love you a lot''
त्याच्या ह्या उत्तराने तर ती सुन्नच झाली...... तिला काहीच  सुचेना....... तिच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली ......... तिला त्याच्या ह्या व्यक्त होण्याचा जितका धक्का बसला होता तितकाच आत मनामध्ये कुठेतरी खूप आनंद हि झाला होता  ...... खूप जास्त आनंद .........  तिच्या डोळ्यातून आसवं वाहात होती अन होटावर हसू हि होत......... कदाचित ती ह्याच दिवसाची वाट पाहात होती जणू ......... तिला त्याच्या ह्या भावनांची जाणीव आधीपासूनच होती ......... फक्त त्याने व्यक्त करण्याचा अवकाश होता ......... ती खूप खूप खूप जास्त आनंदात होती ......... पण म्हणून तिने हुरळून जाऊन कोणताही निर्णय नाही घेतला. तिने स्वतःला सावरल ......... आणि शांत झाली ......... दरम्यान तो तिकडे अस्वस्थ झाला ......... त्याला तिच्याकडून काहीच reply मिळेना म्हणून तो कासावीस झाला ......... त्याचे SMS वर SMS येऊ लागले , जेणे करून तिने काहीतरी react कराव ......... तिने त्याला काहीच reply दिला नाही. ती त्याच सगळ म्हणण शांतपणे ऐकत (वाचत) होती.


खरतर त्याला ती आधी पासूनच आवडायची (अस त्यानेच तिला एकदा सांगितलं होत) पण कधी सांगण्याची हिम्मत नाही झाली. म्हणूनच तर तो ट्रेनिंग दरम्यान तसा विचित्र वागला होता. त्याला तिचा साधेपणा फार भावला, वडिलांच्या जाण्यानंतर तिच जबाबदारीने घर संभाळण, नोकरी करून शिक्षण घेण आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा तिचा स्वभाव हे सर काही त्याला खूप भावल. त्याला जशी जोडीदार हवी होती ती अगदी तशीच होती.


त्याने तिला propose करून बरेच दिवस झाले होते पण तिने काहीच उत्तर दिले नव्हते त्याला. तो अधून मधून SMS करून hi , hallo , कशी आहेस वगैरे तिला विचारात असे ती हि मोजकीच अशी उत्तरे देई. काही केल्या तिच्या डोक्यातून त्याचा विचार जाईना. ती त्याला ओळखत होती, तिने त्याच्या सोबत काम केल होत, त्याच caring nature तिला हि खूप आवडायचं. खरतर तिला त्याच्या कडून खूप काही शिकता आल होत. तिचा पहिला जॉब, तिच्यासाठी सगळच नवीन होत, तिला साधी print सुद्धा काढता येत न्हवती पण अस असून सुद्धा त्याने कधी तिला रागाने फटकारले नाही या उलट त्याने तिला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तिच्या मनातही त्याच्याबद्दल soft corner होताच . असे विचारातच काही दिवस गेले. तिला नेहमी वाटायचं कि ''आपण कोणावर किती प्रेम करतो त्यापेक्षा कोणीतरी आपल्यावर किती प्रेम करत हे जास्त महत्वाच असत''. एकेदिवशी तिने त्याला SMS केला आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याला खूप खूप आनंद झाला.


ती दोघ हि भिन्न जातींची......... ती महाराष्ट्रीयन आणि तो साउथ इंडिअन......... पण प्रेमाला कुठे असते जात - धर्म. ती दोघ कधी एकमेकांच्या प्रेमात पडली हे त्यांनाही कळले नाही.........त्यांचे रोजच एकमेकांना SMS किवा call होऊ लागले. सगळ काही स्वप्नवत होत तिच्यासाठी .........