गोड गैरसमज की विश्वासघात? भाग १

Started by बुद्धभूषण गंगावणे, May 22, 2016, 01:10:56 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

[si                                 गोड गैरसमज की विश्वासघात? भाग १
                   पहिल मला वाटल नव्हत की माझ्या मनात तिच्या विषयी अशी भावना कधी येऊ शकते.
आम्ही त्या दिवशी आधी सुद्धा खूप वेळा भेटलो होतो पण आम्ही कधी एकमेकांशी बोललो नाही कारण तशी कधी वेळच आली नव्हती.
एकदा ती आमच्या घरी रहायला आली या वेळी तिची नजर खूप वेगळी होती तिचे डोळे मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होते
पण मी ते ओळखू शकलो नाही.
                          आम्ही मुंबई फिरायला गेलो तिकडे आम्ही समुद्र चौपाटी फिरत होतो तेव्हा नकळत तिच्या हाताचा माझ्या हाताला स्पर्श झाला
हा स्पर्श थोडा वेगळाच होता आणि नजर भिडली, आम्ही वेड्या सारखे आमच्या डोळ्यात काहीतरी शोधत होतो,
आणि ते आम्हाला सापडले सुद्धा पण ते एकमेकांन समोर व्यक्त करण्याची आमची हिंमत होत नव्हती.
आम्ही उगीचच नजर चोरत होतो . आम्ही तिकडुन आल्यावर दुसऱ्या दिवशी गावी जाण्यासाठी निघालो .
                             गाडीत असताना मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे चोरून बघत होतो पण आम्हा दोघांनाही बोलण्याची हिंमत येत नव्हती तसे करता करता आम्ही गावी पोहोचलो, गावचा मुक्काम मोठा होता विचार केला सांगून टाक तिला सगळं पण मन ऐकत नव्हतं कित्येक दिवस तिला एक टक बघन्यातच गेले.
कदाचित तिला सुद्धा समजत होत्या माझ्या भावना कारण तिचे माझ्याशी वर्तन वेगळे वाटत होते ती माझ्या बरोबर अचानक बोलू लागली माझी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊ लागली . शेवटी तो दिवस आला आम्ही गावातुन देव दर्शना साठी एका देवस्थानी गेलो होतो आम्ही प्रवासासाठी एक टेम्पो भाड्यानी घेतला होता .
[/size][/size]