गोड गैरसमज की विश्वासघात? भाग २

Started by बुद्धभूषण गंगावणे, May 22, 2016, 01:19:06 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

                                गोड गैरसमज की विश्वासघात? भाग २
टेम्पो मध्ये आम्ही खूप धिंगाना घातला ती जरा गप्प होती .
तिला माझ्या समोर व्यक्त व्हायचे होते पण घरचे मंडळी असल्याने तिला काही बोलता आले नाही ,
बघता बघता देवस्थानी येऊन पोहोचली आम्ही दर्शन वगैरे घेतले ,
जेवण केले आणि टेम्पो मध्ये जाऊन बसलो ती माझ्या शेजारी होती जेवल्या मुळे टेम्पो मध्ये थोडे अस्वस्थ वाटत होते म्हणून आम्ही दोघे उभे राहिलो आणि बोलत असताना अचानक तिने माझा हात तिच्या हातात घेतला मला काहीच समजेनासे झाले तिचे डोळे माझ्याकडे उत्तर माघत होते.
          आम्ही संपूर्ण प्रवास असाच एकमेकांना पाहात पूर्ण केला विशेष म्हणजे प्रवासात आम्ही एकमेकांशी एक शब्द सुद्धा बोललो नाही फक्त डोळ्यात पाहात होतो आम्ही गावातील घरी पोहोचलो आम्हाला थोडा एकांत मिळाला . मी तिचा हात हातात घेतला ती थोडी लाजली लाजताना ती खूप सुंदर दिसत होती मी तिच्या समोर माझ्या भावना व्यक्त केल्या तिने मला घट्ट मिठी मारली मला काहीच सुचेनासे झाले माझा हा प्रथमच अनुभव होता.
त्यानंतर आम्ही एकमेकांची खूप काळजी घेऊ लागलो. घरच्यांच्या न कळत आम्ही आमची एक वेगळच आयुष्य जगत होतो. आम्ही एकमेकांच्या मनातल्या सर्व गोष्टी समजत होतो. आम्ही एकमेकांशी डोळ्यात संवाद सादत होतो,ती माझ्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनली होती. आम्ही लग्न करायचे ठरवले होते, ती या निर्णयाने खूप खूष होती,नंतर मी मुंबईला निघून आलो त्यानंतर आम्ही फोनवर खूप गप्पा मारायचो अचानक मला तिच्या बोलन्यात तिच्या आवाजात बदल कळू लागला, मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण ती नीट उत्तर देत नव्हती ती विषय टाळण्याचा प्रयत्न करत होती तिला त्रास होऊ नये म्हणून मी सुद्धा त्या विषयावर बोलण्याचे टाळले .