प्रेम आहे हेच खरे.

Started by Dnyaneshwar Musale, May 22, 2016, 06:07:37 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

अंगी दाटले  रंग तुझे खुळेच शब्द
समोरी तु असे मी स्तब्द
संवादात माझ्या बंद तुझे ओठ
विसरून वाट, जाई तुझ्याकडे बोट.

रंगवुन चित्रे दिसे तुच परी
शोधण्यास तुझं गाडुन येतो खोल दरी
बहरून फुलावे तु गुलछडी
लाजताना उमलशी हर एक घडी.

सुसाट मन प्रेमळ नातं
फितुर रात न कुठला स्वार्थ यात
बांधुन चंग बोलावे तुझं काही
न दिसता डोळा झाकुन तुलाच पाही.

तुझ्या पैजणावर जडला गाण्याचा छंद
चाखुन घे तु प्रेमाचा गुलकंद
नको गावगोंधळ हे नाटक आता पुरे
खोट नसे काही प्रेम आहे हेच खरे.