aayushya

Started by Vaishnavi Dilip Dhumane, May 25, 2016, 09:11:41 PM

Previous topic - Next topic

Vaishnavi Dilip Dhumane

               आयुष्य

बसावं कधीतरी "आयुष्य" सागराच्या किनाऱ्यावरी
मारून यावी आठवणींच्या नावेतून एखादी फेरी...
जावे खूप आत अन बघावे दिसते का कोणी किनाऱ्यावरी...
टाकून बघावी सागरात एखादी उडी
बघूया !!! येते का वाचवायला कोणीतरी तरी ??!!
घ्यावे प्रेमाच्या पाण्याचे शहाळे
अन बघावे किती straw येतील share करण्यापरी...
करावे special क्षणांचे शंख-शिंपले जमा
किती छान बरे होईल त्याचा showpiece ...
चालावे त्या रुपेरी वाळूवरून बघत तिची चकाकी...
न्याहाळावी आनंदात आयुष्याची सोनेरी किनार ती...
बघावे "त्या" लाल सूर्याकडे डोळे भरुनी...
जो देतो उद्याच्या आयुष्याची भरारी..
वाटते ना...न जावे परत या किनायावरुनी...
म्हणूनच तर भटकावे निवांत इथे कधीतरी तरी...

                     -   वैष्णवी दिलीप दुमणे