वचन

Started by पल्लवी कुंभार, May 30, 2016, 04:34:03 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

त्या कातरवेळी
पडला काळोख अवतीभवती
सोबतीला प्रिय सखी
अन निरव शांतता ही
सुप्त कोपऱ्यात मनी
का चाळवाचाळव झाली
घेतला हात हाती
अन नभात वीज कडाडली
मनमोहक त्या क्षणी
त्याच्यात ती सामावली
हलक्या सरीत भिजून
ही वाट एक झाली
अशा अनामिक रात्री
फक्त मेघ निनादी
शांत नदीच्या किनारी
जोडपी वचनबद्ध जाहली
एकेक काडी वेचली
मनभावी खोप्यापायी
स्वप्नपूर्ती खरी केली
जागल्या वचनांची

~ पल्लवी कुंभार