तृषार्थ

Started by पल्लवी कुंभार, May 30, 2016, 04:52:20 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

सप्तरंगी या जीवनी
जगते सर्व इच्छा मी मनकवडी
का हा समुद्र रोरावतो
मनी सुप्त इच्छांनी रुद्रावतो
वासनेचे मेघ उरी बांधतो
प्रेमसरींनी असा वर्षावतो
विरहाच्या धुक्यात तुला शोधतो
थंडीच्या उन्हात तुला बिलगतो
सोबतीला रात्रीच्या सावली धुंडाळतो
पाहावे शिल्प तसे न्याहाळतो
आसक्त भ्रमरापरी ओठांना स्पर्शतो
तृष्णेचे घडे मिलनात भरतो
मोरपिशी स्वप्नांची आस धरतो
या घडीला, एक तृषार्थ, नदीसवे वाहतो

~ पल्लवी कुंभार

कवी - गणेश साळुंखे

नमस्कार
तुमच्या 3 कविता वाचल्या मेहंदी तर खुपच आवडली अन त्याहुन तृषार्थ मनाला अधिक भावली प्रेमाच अन शृंगार रसाचं वर्णन अद्भुत शब्दांत मांडलय तुम्ही really awesome and romantic...