ती पण आता पुसट वाटू लागलीय

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:27:17 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला

तिला कि मला स्वतःला

विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला

तिला कि मला स्वतःला

ती पण आता पुसट वाटू लागलीय

अवती भवति तिच्या विचारांची गर्दी झालीय

स्वतः शोधतोयं त्या मनाला

ज्याने साद दिली होती पूर्वी तिच्या भावनांना

आढे वेढे घेवून लग्नाचे पेढे वाटले

कमी होते कि काय म्हणून

राहत्या घराचे दरवाजे पण छाटले

छाटून  सर्व खिडक्या अन दारें   

एक सुंदर घरकुल थाटले

टाकली भिंत मध्ये उभी

पल्याड ते सर्व नातलग

अल्याड माझे दोन छकुले जीवलग

त्यांनाच घेउनि पुढे जायचे

त्यांनाच बघुनी स्वतःशी लढायचे

अन लढता लढता कायमचे जायचे

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

uttam pawar

डॉक्टर साहेब बस झाले आता सहन होत नाहीय . हे सर्व वाचून आता आमचे पण हात शिवशिवू लागले आहेत. दोन शब्द आता मी पण लिहितो .

siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C