II चांदणं फितूर झालं II

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:36:08 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

चांदण्याने फितुरी करुनी

शशिस जणू फसविले 

शोधून कंटाळला तो

पण कौमुदीने हरविले II

गुप्त  होई तो प्रकाश

रिक्त ते  सारे आकाश

चांदण्यावीन व्यर्थ सारे 

निरर्थक ती यामिनी

तिमिर खाई व्योमास

तिमिर दाटे  काननी II

भेटुनी तो भास्करास पुसे 

कौमुदी का पाहिली ?

उत्तरे रवि त्यावरी

आता ती तुझी नाही राहिली II

शोध घेई चान्द्न्याञ्चा

चाले  सिम्हावलोकन

भूतकाळ नित्य स्मरण

घेउनि हाती दर्पण 

रडू  कोसळे शशीला

स्वगत करी मनाशी

उगवल्यानंतर कसा आता

खेळू मी कुणाशी ?

कसे वाहू ओझे मी

अम्बराचे तुझ्याविना ?

तूच माझी सहचारिणी

ये जवळ पुन्हा पुन्हा II
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


spatankar_13

धन्यवाद मित्रा . देवाची कृपा आहे आपल्या सर्वांवर म्हणून कल्पना येते.