प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2016, 08:54:03 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

मी मोर झालो तुझ्यासाठी

थुई थुई नाचे लग्नासाठी

रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली

घरच्यांनी वाहिली अन हाणली काठी

तरी मी थुई थुई नाचलो लग्नासाठी

प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठीII

मी श्वान झालो तुझ्यासाठी

भून्कतं राही अवती भवति

रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली

तुचं वाहिली अन हाणली काठी

तरी मी भून्कतं राही अवती भवति

प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठीII

मोर होवुनी काय जाहले   

होते नव्हते धुळीस मिळाले

श्वान होवुनी काय जाहले

होत ते पण मनं पोळले

वेडा म्हणुनी ख्याती जाहली

श्रापांची शिदोरी वाढत गेली II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


spatankar_13

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

मित्रा तुझ्या अभिप्रायाने मी आज धन्य  झालो . मातृभाषेचे पांग फेडल्याप्रमाणे वाटले बघ . धन्यवाद मित्रा . असे वाटतेय अटकेपार झेंडा फडकला एकदा .